मुंबई, १२ मे २०२३ : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने शिंदे-फडणवीसांना उघडे पाडले आहे. हे सरकार तीन महिन्यात जाणारआहे. अधिकाऱ्यांनी या बेकायदा सरकारचे बेकायदेशीर आदेश पाळू नयेत असे विधान उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत माध्यमांशी संवाद साधताना केले.
राज्यातील हे सरकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. फुटलेला गट हा मूळ पक्षावर दावा करु शकत नाही हे न्यायालयाने सांगितले आहे. मग तुम्ही कसले पेढे वाटताय? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. या सरकारचा मृत्यू अटळ आहे. हे सरकार तीन महिन्यात जाणार असल्याचे राऊत म्हणाले.
प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या बेकायदा सरकारचे बेकायदेशीर आदेश पाळू नयेत. आदेश पाळाल तर अडचणीत याल. त्यांचे सर्व आदेश बेकायदेशीर आहेत असे सांगून राऊत म्हणाले. आम्ही सत्तेसाठी भुकेलो नाही. उद्धव ठाकरेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे. त्यांचे काहीही चुकले नसल्याचेही संजय राऊत म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी अनिल खळदकर











































