55 तासांत 10 व्हिडिओ आले, फक्त प्रियांका गांधींना शांतता भंग केल्याबद्दल अटक, आशिष मिश्राची चौकशीही नाही

लखिमपुर, 6 ऑक्टोंबर 2021: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचारानंतर राजकारण तापले आहे. 55 तासांच्या कालावधीत, घटनेशी संबंधित किमान 10 व्हिडिओ समोर आले आहेत, परंतु आतापर्यंत 8 मृत्यूंच्या प्रकरणात एकालाही अटक करण्यात आलेली नाही.

अटकेच्या नावाखाली फक्त प्रियांका गांधींना शांतता भंग केल्याबद्दल अटक करण्यात आलीय. या प्रकरणात, गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राची कोणतीही चौकशी झालेली नाही.

आशिष मिश्रा यांना एफआयआरची माहिती नाही

त्याचवेळी, घटनेच्या दोन दिवसानंतर, जिथं मृत शेतकऱ्याचे नातेवाईक अंतिम संस्कार करण्यास नकार देतात, तिथं आरोपी आशिष मिश्राला घटनेच्या तिसऱ्या दिवसानंतरही स्वतःविरोधातील एफआयआरची माहिती नाही. बरं उत्तरं फक्त तपासाद्वारेच सापडतील, पण प्रश्न असा आहे की कोणत्या व्हिडीओच्या आधारे अनेक लोकांनी देशात आपलं मत बनवायला सुरुवात केलीय. तोच व्हिडिओ समोर आल्यानंतरही मंत्र्याच्या आरोपी मुलाची चौकशी करणं आवश्यक नव्हतं का?

पुरावे गोळा केल्यानंतरच पोलिस कोणालाही अटक करू शकतात हे खरं आहे. पण ज्या व्हिडीओच्या आधारे आरोप केले जात आहेत त्या सर्व व्हिडीओमध्ये आरोपी आशिष मिश्राचीही ताबडतोब चौकशी करू नये? जेणेकरून तपासाला गती मिळेल आणि संवेदनशील विषयावर राजकीय गदारोळ बंद पडेल.

लखीमपूर खेरीचे शेतकरी आंदोलक का बनले?

या संपूर्ण घटनेपूर्वी एक प्रश्न उपस्थित झाला की उत्तर प्रदेशच्या मध्यभागी उपस्थित असलेल्या लखीमपूर खेरीचे शेतकरी आंदोलक का बनले? केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी सप्टेंबरच्या अखेरीस दिलेल्या वक्तव्यामुळं हा दावा करण्यात आला, ज्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना दोन मिनिटांत अद्दल घवण्याचं बोललं होतं. या निवेदनात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा खासदार, आमदार होण्यापूर्वी स्वतःला त्यांच्या इतिहासाची आठवण करून देताना दिसले.

काय आहे मंत्र्यांचा इतिहास …

अजय मिश्राविरोधात लखीमपूरच्या टिकूनिया पोलीस ठाण्यात हत्या, घरात घुसून मारहाण, बंड यासारखे चार गुन्हे दाखल आहेत.

5 ऑगस्ट 1990 रोजी टिकुनिया पोलीस स्टेशनमध्ये अजय मिश्रासह 8 जणांवर शस्त्रांनी हल्ला केल्याचा आरोप होता.

8 जुलै 2000 रोजी प्रभात गुप्ता नावाच्या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी अजय मिश्रासह चार लोकांविरोधात एफआयआर दाखल झाला होता.

31 ऑगस्ट 2005 रोजी, गावच्या प्रमुखाने अजय मिश्रासह चार लोकांवर प्राणघातक हल्ला आणि दंगलीचा गुन्हा दाखल केला होता.

24 नोव्हेंबर 2007 रोजी अजय मिश्रासह तीन लोकांविरोधात हल्ल्याचा चौथा गुन्हा दाखल करण्यात आला.

मुलगा आशिष मिश्रा यांना 2005 आणि 2007 च्या वडिलांच्या प्रकरणातही दोषी ठरवण्यात आलं होतं

2004 मध्ये, ज्या दिवशी अजय मिश्राला खून प्रकरणात कनिष्ठ न्यायालयातून निर्दोष मुक्त करण्यात आलं, तो योगायोग होता की दुसऱ्या दिवशी निकाल सुनावणारे न्यायाधीशही निवृत्त झाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा