बंगळुरूमध्ये Income Tax च्या धाडीत सापडंल 100 कोटींच घबाडं

बंगळुरूमधील शिक्षण संस्थेवर छापा

बंगळुरू(कर्नाटक)- Income Tax विभागाला कर्नाटकमधील एका उद्योग समुहावर टाकलेल्या धाडीत मोठे घबाड हाती लागले आहे. संबंधित उद्योगसमुह मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक संस्था चालवतो. त्यांच्याकडे अनेक इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजस आहेत. या धाडीत एकून 100 कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती आढळून आल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे. या उद्योगसमुहाकडील संस्थामध्ये उच्च शिक्षणाशी 50 ते 65 लाख डोनेशन घेऊन जागा भरल्या जात असल्याचे उघडं झाले आहे.

शैक्षणिक संस्थांच्या मुख्य विश्वस्तांच्या घरावर मारलेल्या छाप्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी संपत्ती आणि रोख रक्कम सापडली. त्यांच्या घरात 89 लाखांची रोख सापडली असून त्यांच्याकडे एकूण 4 कोटी 22 लाखांची रोख रक्कम सापडल्याची माहितीही देण्यात आलीय. आयकर विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हे छापे घालण्यात आले. या छाप्यांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या छाप्याशी राजकीय संबंधांनाही जोडलं जात असून एवढी संपत्ती कशी जमा होऊ शकते असा प्रश्नही आता विचारला जातोय. दरम्यान, या शिक्षण संस्थेचे नाव समोर आले नसून, या प्रकणात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा