पुणे-लोणीकाळभोर : मागील दोन दिवसात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरुना संसर्गजन्य रोगावर मार्ग काढण्यासाठी देशातील जनतेला आव्हान केले होते. 22 तारखेला रविवारी सकाळी सात ते रात्रीनऊ वाजेपर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये जेणेकरून गर्दी वाढून हा संसर्गजन्य रोग पसरणार नाही याची काळजी घेण्यासाठी आव्हान केल्यानंतर आज लोणी काळभोर – कदम वाकवस्ती येथील नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद देत बंदमध्ये सहभाग नोंदवला आहे.व लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर, उपनिरीक्षक शिवाजी ननावरे,पोलीस नाईक रुपेश भगत,मुकुंद रनमोडे,प्रमोद शिंदे,महेंद्र चांदणे,सुनील नरके,अभिमान कोळेकर,पोलीस वार्डन सुशांत वरळीकर,दादा लोंढे यांच्या कडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे !
नागरिकांनी आपल्या घरांमध्ये राहणे पसंत केले. आज रविवारी जनता कर्फूला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. येथील , लोणी स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज चौक,लोणी गाव , परिसर ओस पडलेले दिसत आहे. दरम्यान सोलापूर- पुणे महामार्गावर नेहमीच मोठी वाहतूक असते मात्र आज या रस्त्यावरही शुकशुकाट पहावयास मिळाला.
व आज जनता कर्फ्यूचे पालन करतांना लोणी काळभोर – कदम वाकवस्ती च्या लोकांनी प्रचंड मोट्या संख्येने उपस्थित दर्शवली होती . व कदम वाकवस्ती नागरिकांनी सायंकाळी 5 वाजता आपल्यासाठी कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या सर्व डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस, प्रशासनातील अधिकारी यांना टाळ्या आणी थाळी वाजवून मानवंदना दिल्या.