मुंबई, १ ऑगस्ट २०२० : राज्यातील कोरोनास्थिती हि जैसी थी असून आज देखील १० हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.त्या बरोबरच राज्यात प्रशासन हे युद्ध पातळीवर काम करतंय तर येत्या ५ ऑगस्ट रोजी लाॅकडाऊन नियमात शिथलता आणायचा विचार चालू आहे.
महाराष्ट्रात गेल्या २४ तासात १०,३२० नवे कोरोना रुग्णांचे निदान झाले असून २६५ जणांचा मुत्यू झाला आहे.१,५०,६६२ रुग्णांवर ॲक्टिव्ह उपचार सुरू आहेत तर आज ७,५४३ रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत.आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २,५६,१५८ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.६८ टक्के आहे. सध्या अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी