लॉक डाऊन काळामध्ये १,०६,५६९ गुन्ह्यांची नोंद

मुंबई, दि. १५ मे २०२०: राज्यात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा चालू आहे. या कारणाने लोकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच काही नियम व शर्ती देखील सरकारने घालून दिले आहेत. यादरम्यान नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून करावी करण्यात आली आहे. यामध्ये राज्यात कलम १८८ नुसार १ लाख ६ हजार ५६९ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यांपैकी २० हजार १९५ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. अवैध वाहतूक करणाऱ्या १२९६ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ५७ हजार ४७९ वाहने जप्त केले गेले आहेत.

परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनाच्या १५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. आत्तापर्यंतर विविध गुन्ह्यांसाठी ४ कोटी ९ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पोलिसांवर हल्ल्याच्या २१८ घटना समोर आले असून यातील ७७० आरोपींना अटक करण्यात आली आहे. १०० वर आलेल्या ९१ हजार १९६ कॉल्सची योग्य दखल घेण्यात आले असून त्यायोगाने कारवाई करण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत ३ लाख ५३ हजार ४१४ पास वितरित करण्यात आले आहेत. राज्यातील क्वारंटाईन व्यक्तींची एकूण संख्या ३ लाख १२ हजार ८४० इतकी असून क्वारंटाईन शिक्का असलेल्या ६६९ व्यक्तींना शोधून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. राज्यात ३९६४ रिलिफ कॅम्प असून त्यामध्ये जवळपास ३ लाख ८४ हजार १८८ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस देखील २४ तास कार्यरत आहेत. कोरोनाविरुद्ध लढा देताना पॉझिटिव्ह आढळलेल्या १०७ पोलीस अधिकारी, ८९४ पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू करण्यात आले आहे. मुंबई ६, पुणे १, सोलापूर शहर १, नाशिक ग्रामीण १ अशा ९ पोलीस वीरांना कोरोना मुळे जीव गमवावा लागला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा