१० वी १२ वी सीबीएसई परीक्षा ४ मेपासून होणार सुरू, १५ जुलैपर्यंत लागणार निकाल

नवी दिल्ली, १ जानेवारी २०२१: कोरोना कालावधी दरम्यान, लाखो सीबीएसई विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी बोर्ड परीक्षांची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा ४ मे ते १० जून या कालावधीत घेण्यात येणार आहेत. १५ जुलैपर्यंत निकाल जाहीर होणार आहेत.

कोरोना साथीच्या आजारामुळं शाळा आणि महाविद्यालये बर्‍याच दिवसांपासून बंद आहेत. मुलांना ऑनलाईन वर्गातून शिकवले जात आहे. दरम्यान, केंद्र सरकार ही परीक्षा ऑनलाईन घेऊ शकेल अशी अटकळ होती. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा मार्च किंवा एप्रिलमध्ये घेतल्या जाऊ शकतात. परंतु, परीक्षा ऑफलाइन घेण्यात येणार असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी काल आपल्या निवेदनात स्पष्ट केलं.

शिक्षणमंत्र्यांनी काय सांगितले…

शिक्षणमंत्री म्हणाले की, या वेळी आपले विद्यार्थी किंवा पालक मागं राहिले नाहीत. योद्धा म्हणून शिक्षकही पुढं आहे. आता असे काही विद्यार्थी आहेत जिथं ऑनलाईन शिक्षण उपलब्ध नाही. तिथं वन नेशन वन डिजिटल मोहीम राबवली जाण्याची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार डीटीएचच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना टीव्हीद्वारे शिकवलं जात आहे.

शिक्षणमंत्री ‘निशंक’ यांनी यापूर्वी ट्वीट केलं होतं की, मला खात्री आहे की सीबीएसईतर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत भाग घेणारे आमचे विद्यार्थी पूर्ण समर्पण व मेहनतीनं उत्तम तयारी करतील. आपलं उज्ज्वल भविष्य आणि आरोग्य लक्षात घेऊन आम्ही या परीक्षांच्या तारखांची घोषणा संध्याकाळी ६ वाजता करू.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा