अटलांटा, 15 सप्टेंबर 2021: अमेरिकेतील प्राणिसंग्रहालयात उपस्थित असलेल्या 60 वर्षीय पुरुष गोरिल्लासह 13 गोरिल्लांना कोरोनाची लागण झाली आहे. प्राणिसंग्रहालय प्रशासनाने ठामपणे सांगितले आहे की काही तेथील कर्मचाऱ्यांमुळे त्यांना संसर्ग झाला असावा. प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांना असं दिसून आलं की, गोरिल्लाला खोकला आणि नाक वाहणे अशी लक्षणे निदर्शनास आली, तेव्हा त्यांची तपासणी करण्यात आली. त्याच वेळी, त्यांची भूक संपली. सर्वात मोठा प्रश्न असा आहे की या गोरिल्लांना कोरोनाच्या डेल्टा प्रकाराने इनफेक्ट केले आहे का?
हे गोरिल्ला अमेरिकेच्या अटलांटा येथे असलेल्या प्राणिसंग्रहालयात राहतात. त्यांना वेस्टर्न लोलँड गोरिल्ला म्हणतात. या गोरिल्लापैकी सर्वात वयस्क गोरिला 60 वर्षीय आहे ज्याचं नाव Ozzie आहे. त्यांच्या स्वॅबचे नमुने जॉर्जिया विद्यापीठाच्या पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. जिथे हे सर्व 13 गोरिल्ला कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता प्राणिसंग्रहालय अधिकारी आयोवा येथील राष्ट्रीय पशुवैद्यकीय सेवा प्रयोगशाळेच्या अहवालाची वाट पाहत आहेत.
प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांचा असा दावा आहे की, गोरिलांमध्ये कोरोना संसर्गामुळे मोनोक्लोनल अँटीबॉडीज विकसित होण्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आता प्राणीसंग्रहालयात उपस्थित असलेल्या सर्व 20 गोरिल्लांची तपासणी केली जाईल. हे 20 गोरिल्ला चार गटात राहतात.
प्राणीसंग्रहालय प्रशासनाचा असा दावा आहे की, गोरीलांना कोरोनाची लागण एका लक्षणे नसलेल्या कर्मचाऱ्याद्वारे झाली आहे. तर, या कर्मचाऱ्यांना पूर्णपणे लसीकरण केले जाते. तसेच, जेव्हा तो गोरिल्लांची काळजी घ्यायचा, तेव्हा तो पूर्ण सुरक्षा किटमध्ये राहायचा. त्याच्या चेहऱ्यावर मास्क, हातात हातमोजे आणि पीपीई किट देखील होते. आतापर्यंत असे कोणतेही पुरावे सापडले नाहीत की कोणत्याही पर्यटक किंवा प्राणीसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्याला गोरिलामधून कोरोनाची लागण झाली आहे.
अटलांटा प्राणिसंग्रहालयातील पशु आरोग्य विभागाचे वरिष्ठ संचालक डॉ सॅम रिवेरा म्हणाले की, या बातमीने आम्हाला खूप काळजी वाटते. आम्ही कोरोनाशी संबंधित सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करत होतो, तरीही आमच्या 13 गोरिल्लांना कोरोनना संसर्ग झाला आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू. राष्ट्रीय तपास अहवाल येताच त्यांच्यावर उपचार सुरू केले जातील. सध्या काही औषधे दिली जात आहेत.
सॅम रिवेरा यांनी सांगितले की, ग्रेट एपला कोरोना संक्रमण होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी जानेवारीमध्ये सॅन दिएगो प्राणिसंग्रहालय सफारी पार्कमध्ये 8 गोरिल्लांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. सॅन दिएगोमधील सिल्व्हरबॅक गोरिल्लाला एक्सपेरीमेंटल एंटीबॉडी रेजीमेन दिले गेले. यानंतर सर्व गोरिल्ला बरे झाले. सॅम म्हणाले की गोरिल्ला एकत्र राहत आहेत, म्हणून त्यांना वेगळ्या बंदिवासात कैद करता येत नाही. ते चिस्तील आणि दुःखी होतील.
सॅम रिवेरा म्हणाले की आम्ही या गोरिल्लांना जनावरांसाठी बनवलेली कोरोना लस देऊ. या व्यतिरिक्त, आम्ही या लसीद्वारे बोर्नियन आणि सुमात्रान ऑरंगुटन्स, सुमात्रान वाघ, आफ्रिकन सिंह आणि आफ्रिकेतील बिबट्यांना देखील लसीकरण करू. 60 वर्षीय ओझीला कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणे आहेत. तो लवकरच त्यातून सावरेल. तो एक अतिशय शक्तिशाली गोरिल्ला आहे. आम्ही प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेची जास्तीत जास्त काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे