१३ वर्षीय मुलीने केली आत्महत्या

बीड, १० मार्च २०२१ ;राज्यात अलीकडेच अल्पवयीन मुलांच्या आत्महत्येची प्रकरणे वाढत चालली आहे.हल्ली जीवमान बदलत आहे.पण या सर्वांत,लहान मुलांच्या मेंदूवर हल्ली काय परिणाम होतोय.आज पुन्हा एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे.जिथे फक्त १३ वर्षीय एका मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बीडच्या धारूर तालुक्यातील अंजडनडोह गावातून  हि घटना समोर आली आहे.जिथे केवळ १३ वर्षीय  मुलीने सोमवारी रात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.या आत्महत्येमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.रेणुका शंकर रेपे असे त्या चिमुकलीचे नाव आहे.आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या प्रकरणी धारूर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पण या घटनेमुळे  पूर्ण गाव हादरला आहे.आजची लहान मुलं हि सध्या मोठ्या प्रमाणात मोबाईल किंवा दुसर्या गोष्टींवर अवलंबून राहिले आहेत.ज्यामुळे त्यांच्या मानसिकतेत बदल होत आहे.त्यामुळे पालकांनी  ही आपली मुलं काय करतात त्यांना आपली किती गरज आहे.हे जाणून घेणं गरजेचं आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा