शिक्षकानेच केला १३ वर्षीय विद्यार्थ्यिनीवर बलात्कार….

पन्ना (मध्य प्रदेश), २७ जानेवारी २०२१: मध्य प्रदेशच्या पन्ना येथे एका १३ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा बलात्कार दुसरे तिसरे कोणी केला नसून तिच्याच शाळेतील शिक्षकांने केल्याचे समजत आहे. ज्या मुळे पुन्हा एकदा मानवते ला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

पीडिता हि गरीब घरातील आहे. ती ज्या सरकारी शाळेत जाते त्याच शाळेतील शिक्षक नरधमावर हे कृत्य केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयाकडून करण्यात आला आहे. दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी माहिती दिली आहे.

पीडितेचा लहान भाऊ शिक्षकाच्या घरी टिव्ही पहायला गेले. काही वेळा नंतर पीडिता भावाला घरी बोलवण्यासाठी गेली आसता शिक्षकाने भावाला घरी पाठवले आणि पीडितेला काम असल्याचे सांगत थांबवून घेतले आणि भाऊ घरी गेल्या नंतर तिच्या वर बलात्कार केला.

पिडिता घरी आल्यावर घडलेला सर्व प्रकार सांगितला. ज्या नंतर कुठलीही पर्वा नकरता तिच्या कुटुंबीयांनी पोलिस स्टेशन गाठले आणि नराधम शिक्षका विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा