ऑल इंडिया डिजिटल केबल फेडरेशनच्या निर्णयामुळे ग्राहकांना आता केबल टीव्ही परवडणार आहे.
त्यानुसार केबल टीव्हीवर आता ग्राहकांना केवळ 130 रुपयांत 150 चॅनेल्स पाहता येणार आहेत. यामुळे महिन्याकाठी त्यांचे 40 रुपये वाचणार आहेत.
शंभरहून जास्त चॅनेल्स पाहायची असतील तर यापूर्वी ग्राहकांना पुढील प्रत्येक 25 चॅनेल्ससाठी वेगळे 20 रुपये द्यावे लागत होते. म्हणजे दीडशे चॅनेल्स पाहायची तर 170 रुपये मोजावे लागत होते. मात्र आता केवळ 130 रुपयांमध्येच दीडशे चॅनेल्स पाहाता येतील.
वरील बदल फेडरेशनने फक्त केबलधारकांसाठीच लागू केले आहेत. डीटीएच ग्राहकांना या बदलांसाठी अजून वाट पाहावी लागणार आहे.