अमेरिकेत कोरोनामुळे गेल्या २४ तासांत १३०३ मृत्यू

वॉशिंग्टन डीसी, दि. २८ एप्रिल २०२०: कोरोना विषाणूच्या साथीचा परिणाम जगभरात वाढतच आहे. महासत्ता देश मानल्या जाणार्‍या अमेरिकेवर या साथीचा सर्वात वाईट उद्रेक झाला आहे. गेल्या २४ तासांत अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे १३०३ लोक मरण पावले. गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेत दररोज १००० हून अधिक लोक आपला जीव गमावत आहेत.

जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार अमेरिकेत आतापर्यंत ५६ हजार १६४ लोकांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. जे कोणत्याही देशात सर्वात जास्त आहे. त्याचवेळी अमेरिकेत आतापर्यंत सुमारे ९ लाख ८७ हजार लोकांना संसर्ग झाला आहे.

अमेरिकेत जानेवारीपासून कोरोना विषाणूचा कहर वाढला आणि बळी पडणाऱ्याची संख्या वाढतच गेली. गेल्या चाळीस दिवसांपासून अमेरिकेत स्टे एट होम आदेश लागू आहे यामुळे जवळपास ९० टक्के अमेरिकन लोक त्यांच्या घरात आहेत.

आतापर्यंत अमेरिकेत कोरोना विषाणूंच्या ५५ दशलक्ष चाचण्या झाल्या आहेत जे कोणत्याही देशात सर्वाधिक आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की अमेरिकेत लॉकडाऊन असले तरी संपूर्ण पणे सगळ्या गोष्टी बंद नाही यावरही खूप टीका केली जात आहे. हेच कारण आहे की अमेरिकेच्या मोठ्या शहरांमध्ये कोरोना विषाणूचा कहर थांबलेला नाही. कोरोना विषाणूमुळे अजूनही न्यूयॉर्कमध्ये सर्वात जास्त विनाश झाले आहे, केवळ न्यूयॉर्कमध्येच सुमारे १८,००० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर येथे ८ लाखाहून अधिक लोकांची चाचणी घेण्यात आली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा