ब्रिटन (वृत्तसंस्था) : मूळचा इंडोनेशियाचा असलेला रेयनहार्ड सिनागा या व्यक्तीने १३६ पुरुषांवर बलात्कार केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात दीडशेहून अधिक लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये दोषी रेयनहार्ड सिनागा या विकृत इसमाला ब्रिटनच्या मँचेस्टर क्राऊन न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिनागा हा मँचेस्टर क्लबबाहेर पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढून तो आपल्या फ्लॅटवर नेत असे. त्यांच्यावर अत्याचार करत असे आणि हा सगळा प्रकार तो चित्रितही करत असे.
याबाबत पोलिसांनी पुरावे असल्याचे सांगितले आहे. त्यांनी जवळपास १९० माणसांना देखील त्रास दिल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
ब्रिटनच्या न्यायिक इतिहासातला सिनागा हा सगळ्यात कुख्यात गुन्हेगार आहे, असं “द क्राऊन प्रॉक्झिक्युशन” सर्व्हिसने म्हटलं आहे.
सिनागाने तुरुंगात किमान ३० वर्षं व्यतीत करायला हवीत असं न्यायाधीशांनी म्हटलं आहे.
या खटल्याच्या वृत्तांकनासाठी प्रसारमाध्यमांवर टाकण्यात आलेले निर्बंध मँचेस्टर क्राऊन न्यायालयाने हटवले. त्यामुळे सिनागा कोण हे आता प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जगाला समजण्यास मदत झाली.
दोन वर्षांपूर्वीच्या सिनागाने खटल्यात दोषी आढळल्याने त्याला २० वर्षांची जन्मठेप सुनावण्यात आली होती. सिनागाने पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
चार विविध खटल्यांमध्ये सिनागा दोषी आढळला आहे. शिवाय बलात्काराच्या १३६ खटल्यांमध्ये तो दोषी आढळला. बलात्काराचा प्रयत्न करण्याच्या ८ तर लैंगिक अत्याचाराच्या १४ गुन्ह्यांमध्ये तो दोषी आढळला. ४८ पीडितांनी सिनागाविरुद्ध तक्रार नोंदवली होती. सिनागा हा अतिशय क्रूर, हिंसक, धोकादायक आणि कारस्थानी माणूस आहे. त्याची सुटका करणं समाजातील अन्य व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नाही, असं महिला न्यायाधीशांनी सांगितलं आहे.