पणजी, २५ ऑक्टोबर २०२२: पणजी जवळील मेरशी पंचायत क्षेत्रात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी व्यक्तींना गोवा पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. तर राज्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असलेल्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्याचे काम एटीएसच्या अधिकाऱ्यांनी चालूच ठेवले आहे.
यापूर्वी वाळपई आणि फातोर्डा आदि विविध भागांतून २२ बांगलादेशींना पोलिसांनी पकडले होते. तर काही जणांची बांगलादेशात रवानगीही केली होती. हीच कारवाई चालू ठेवत एटिएसने मेरशी येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या दोन कुटुंबीयांच्या १२ सदस्यांना काल रात्री ताब्यात घेण्यात आले आहे.
या सर्व लोकांना जुने गोवा पोलिसांकडे सुपूर्द करुन राहत्या घरात नजरकैदेत ठेवण्यात आले असून, त्यांचा सार्वजनिक कारवायात सहभाग होता का, याचा शोध घेतला जात आहे. यापूर्वी ताब्यात घेण्यात आलेल्या २२ पैकी १८ जन हे स्क्ंप दुकांनात बेकायदेशीर राहत होते.
महत्वाचे म्हणजे त्यांच्याकडे बनावड आधार कार्ड व रेशन कार्ड सापडली होती. तर मेरशी येथे ताब्यात घेतलेल्या बांगलादेशी नागरिकांकडे अद्याप तसे काहीही सापडले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर