पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ : देवेंद्र फडणवीस

राज्यातील पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना महाराष्ट्र राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी १५ दिवसांची मुदत वाढवण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली.

याबाबत अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, पोलीस भरतीबाबत आमच्याकडे ११ लाख ८० लाख अर्ज आले आहेत. पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर आता पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी १५ दिवसांची मुदत वाढवण्यात आली असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरताना आलेल्या सर्व अडचणी दूर करण्यात येत असल्याचेही त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी मुदत वाढवण्यासाठीची मागणी करण्यात येत होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा