दौंड ते मनमाड रेल्वेस्थानकादरम्यान १५ दिवसांचा मेगाब्लॉक

पुणे, १२ जानेवारी २०२३ : सोलापूर रेल्वे विभागातील दौंड ते मनमाड रेल्वे स्थानकादरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी मंगळवार (ता. १०) ते बुधवारदरम्यान (ता. २५ जानेवारी) १५ दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे अनेक रेल्वेगाड्या रद्द, तर काही रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. अनेक लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळा देखील बदलल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

रेल्वे प्रशासनाने दुहेरीकरणाच्या कामासाठी कोपरगाव-कान्हेगाव सेक्शनदरम्यान ब्लॉक घोषित केला आहे. मंगळवार (ता. १०) ते बुधवारदरम्यान (ता. २५ जानेवारी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दौंड-निजामाबाद डेमू; तसेच ता. १२ ते १९ जानेवारीदरम्यान दौंड-भुसावळ-दौंड डेमू रद्द करण्यात आली आहे. ता. २१ आणि ता. २३ जानेवारी व ता. २३ ते ता. २५ दरम्यान कोल्हापूर-गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वेगाडी रद्द करण्यात आली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा