मुंबई विमानतळावर ७.८७ कोटी रुपयांचे १५ किलो सोने जप्त, सात प्रवाशांना अटक

मुंबई, १३ ऑक्टोबर २०२२: सीमाशुल्क विभागाने तस्करीविरोधातील कारवाईत २४ तासांत १५ किलो सोने आणि २२ लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त केले असून, याप्रकरणी सात प्रवाशांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने गुरुवारी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ७.८७ कोटी रुपयांचे १५ किलो सोने जप्त केले आहे. त्यांच्याकडून अन्य दोन प्रकरणांमध्ये २२ लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त करण्यात आले आहे.

प्रकरण क्रमांक १ मध्ये, अधिकार्‍यांनी विकसित केलेल्या गुप्तचर माहितीच्या आधारे, दुबईहून आलेल्या एका भारतीय नागरिकाला खास डिझाईन केलेल्या छातीच्या पट्ट्यात साठवलेल्या ९.८९५ किलो सोन्यासह पकडण्यात आले. प्रवाशाने अधिकाऱ्यांना सांगितले की, त्याला दुबई येथे दोन सुदानी ट्रॅव्हलरने सोने दिले होते आणि त्यांना अटक करण्यात आली होती.

दुसर्‍या प्रकरणात, विमानतळाच्या तपास अधिकाऱ्यांनी १.८७५ किलो वजनाची सोन्याची वीट जप्त केली ज्याची किंमत ९९.७५ लाख रुपये आहे.

तर तिसर्‍या घटनेत, अधिकाऱ्यांनी जेद्दाहून आलेल्या दोन प्रवाशांना अनुक्रमे १०६८ ग्रॅम आणि ११८५ ग्रॅम सोने जप्त केले आहे. त्याची एकूण किंमत एक कोटीच्या वर आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा