१५ वर्षे बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी महिलेविरोधात गुन्हा दाखल

लखनऊ: नागरिकता दुरुस्ती कायदा (सीएए) यावरुन देशातील बर्‍याच ठिकाणी निदर्शने होत आहेत. दरम्यान, लखनौमध्ये १५ वर्षांपासून बेकायदेशीरपणे वास्तव्य करणार्‍या पाकिस्तानी महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्तचर विभागाच्या अहवालानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उझमा सलाल असे या महिलेचे नाव आहे.
फाळणीनंतर या महिलेचे कुटुंब पाकिस्तानमध्ये गेले होते. यानंतर पर्यटक व्हिसा म्हणून महिला लखनऊला येत होती. २००४ मध्ये ती ४५ दिवसांच्या टूरिस्ट व्हिसावर भारतात आली होती, परंतु त्यानंतर ती परत पाकिस्तानमध्ये गेली नव्हती. तिचे लग्न झाले होते आणि मुलांसह लखनौमध्ये राहत होते. १५ वर्षे भारताचे नागरिकत्व न घेता येथे वास्तव्य केल्याने उज्माच्या समस्या वाढल्या आहेत कारण नागरिकत्व कायदा तयार झाल्यानंतर वैध कागदपत्रांशिवाय भारतात रहणार्यांचा समस्या वाढतील.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा