ओडिशा ५ जून २०२३ : भारतीय रेल्वेच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात भीषण अपघात शुक्रवारी सायंकाळी ओडिशाच्या बालासोर नजीकच्या बहानग बजार येथे घडला. स्थानकावर थांबलेली मालगाडी, बंगळूर-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि शालीमार चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस या तीन गाड्यांचा हा अपघात घडल्याची ही घटना दुर्मीळ समजली जात आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या १५१ मृतदेहांची आतापर्यंत ओळख पटली आहे.
हे सर्व मृतदेह त्यांच्या मूळगावी पाठवले जात आहेत. ओडिशा सरकारने मृतदेह वाहून नेण्याची मोफत व्यवस्था केली असल्याचे ओडिशाचे मुख्य सचिवांनी सांगितले आहे. शुक्रवारची सांयकाळ ओडिशातून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी जणू काळ बनून आली. बालासोर येथील बहानग बजार रेल्वे स्थानकाजवळ सायंकाळी सातच्या सुमारास तीन रेल्वेगाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या महाभीषण दुर्घटनेत ३०० प्रवाशांचा मृत्यू झाला.
रेल्वे गाड्यांच्या अपघाताची तीव्रता एवढी होती की, कित्येक प्रवाशांचे मृतदेह डब्यांच्या खिडक्या फोडून बाहेर फेकले गेले. या दृर्घटनेत एक हजाराहून अधिक प्रवासी जखमी झाले. ही या शतकातील सर्वात भीषण रेल्वे दुर्घटना आहे. बालासोर, कटक आणि आसपासच्या शहरांतील रुग्णालयांत जखमींवर उपचार सुरू आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर