केरळ, २० जानेवारी २०२१: भारतात मुलींवर होणारे अत्याचार आणि दुसऱ्या गुन्ह्यांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. ज्या मुळे सतत प्रशासन आणि कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण होतं आहे. अश्याच दोन धक्कादायक घटना देशाच्या कोपऱ्यातून आल्या असून संपूर्ण देश पुन्हा एकदा हदरला आहे.
केरळमधे ४४ जणांनी केला बलात्कार….
साक्षरतेचं घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळ मधे एका १७ वर्षीय मुलीवर ४४ जणांनी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीने निर्भया केंद्रस्थानावर काऊन्सिलिंग दरम्यान आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. याप्रकरणी ४४ पुरूषांविरोधात ३२ गुन्हे दाखल करण्यात आले असून २० जणांना अटक करण्यात आली आहे. तर २४ जणांचा शोध घेण्यात येत आहे.
महाराष्ट्रात विवाहितेच्या वडिलांचा दिराकडून खून…..
तर दुसरी घटना महाराष्ट्रातील आहे. नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विवाहित मुलीच्या वडिलांचा तिच्या सासरकडून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. मृत व्यक्तीचे तिच्या पोटच्या मुलीसोबत आनेक वर्षापासून अनैतिक संबंध असल्याचे सासरच्यांकडून सांगण्यात आले. ही घटना उजेडात आल्याने दिराने मित्राच्या मदतीने मुलीच्या बापाची हत्या केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. असे पोलिसांच्या प्राथमिक माहिती मधे समोर आले आहे.
तर या दोन्ही घटनेमुळे देश पुन्हा एकदा हदरला आहे. सहाजिकच कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच मुलींच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या वाईट मनोवृत्तीच्या नराधमांविषयी सरकार ने गांभीर्याने विचार करणं काळाची गरज आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव