स्मशानभूमीत छत कोसळल्याने १८ जण ठार

उत्तर प्रदेश, ३ जानेवारी २०२१ :  गाझियाबाद येथे रविवारी मोठा अपघात झाला, मुरादनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारादरम्यान छत कोसळल्याने अनेक लोक छता खाली दफन झाले. यापैकी १८ जणांचा मृत्यू तर  २४ जण  जखमी झाले आहेत . पाऊसा पासुन वाचण्यासाठी  हे सर्व जण छताखाली उभे राहिले होते . या अपघातात ज्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत होते त्यांच्या एका मुलाचा मृत्यू देखील झाला आहे.
मेरठचे विभागीय आयुक्त अनिता सी मेश्राम यांनी सांगितले की आतापर्यंत १७ जणांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आले  आहे त्याबरोबर ३८ जणाला वाचवण्यात यश आले आहे.
हे छत अडीच महिन्यांपूर्वी तयार करण्यात आले होते , असे म्हंटले जात आहे की मुरादनगर येथील फळ व्यापारी जयराम यांचे मृत शरीरावर अंत्यसंस्कार  करण्यात येत होते. जयराम यांचा  वयाच्या ६५व्या वर्षी निधन झाले. अंत्यसंस्काराच्या वेळी सर्वजण गेटला लागून असलेल्या गॅलरीत उभे होते. यावेळी हा अपघात झाला.
लोकांचा असा आरोप आहे की गॅलरी तयार करण्यासाठी भेसळ सामग्रीचा वापर केला गेला होता . यावेळी तिथे उपस्थित असलेले जयराम यांचे नातु देवेंद्र म्हणाले की आजोबांवर अंत्यसंस्कार करण्यात येत होते . बाकीचे लोक दूर उभे राहुन पाहत होते आणि या दरम्यान छप्पर कोसळले. यामुळे तिथे उभे असलेले सर्व लोक छता खाली दबले गेले. या अपघातात त्यांचे काकांच्या देखील निधन झाले असल्याचे देवेंद्र यांनी सांगितले. एक चुलत भाऊ या  ढिगाऱ्याखाली दबले गेला आहे . या अपघातात त्याचे वडीलही जखमी झाले.
मृतांच्या कुटुंबियांना सरकाराकडून  २-२ लाखाची मदत देण्यात येणार आहे , एनडीआरएफची टीम बचाव कामात गुंतली आहे. पावसामुळे बचाव कार्याला अढथाळा येत आहे. मृतांमध्ये ३ जणांची ओळख पटली आहे. योगेंद्र, बंटी आणि ओंकार अशी त्यांची नावे आहेत . ते संगम विहार आणि मुरादनगर येथील रहिवासी होते . मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या परिवारला  दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आदेश  दिले आहेत. तसेच मंडलायुक्त मेरठ आणि एडीजी मेरठ झोन यांच्या कडून घटनेचा अहवाल देखील  मागविला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : एस राऊत

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा