टँकरमध्ये लपून जाणाऱ्या १८ जणांना पकडले

नांदेड,दि. २५ एप्रिल २०२० : लाॅकडाऊनमुळे आपल्या गावापासून दूर अडकून पडलेल्यांना आपले घर गाठण्याची ओढ लागली आहे. आज (शनिवारी) सकाळी टँकरमध्ये लपून तेलंगणात जाणाऱ्या १८ जणांना नांदेड पोलिसांनी पकडले.

जालना जिल्ह्यातील एका कृषी प्रशिक्षण कंपनीत पदविका अभ्यासक्रमासाठी तेलंगणा व आंध्र प्रदेशातील विजयवाडा, गुडूर, राजमुद्री व काकीनाडा येथील १६ तरुण व दोन तरुणी असे १८ जण दीड ते दोन महिन्यापूर्वी आले होते.

जालन्यात अडकलेल्या या १८ जणांनी एमपी ०९ एचजी३४५७ नंबर असलेल्या या टँकर चालकाला बोलून भाडे ठरविले. आणि त्यानुसार शुक्रवारी रात्री टँकरमधून प्रवास सुरू केला. हवा येण्यासाठी टँकरचे झाकण उघडे ठेवण्यात आले होते.
जालन्यातून निघालेला हा टँकर शनिवारी सकाळी नांदेड शहरातील पूर्णा रोडवरील पावडे पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी अडवून चौकशी केली असता, चालकाकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
पोलिसांनी टँकरची तपासणी केली असता, टँकरमध्ये १६ तरुण व दोन तरुणी असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची तपासणी करून इतर प्रवाशांप्रमाणे विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा