उरीमध्ये पकडला गेला 19-वर्षीय दहशतवादी बाबर, पैशांसाठी लष्कर-ए-तैयबामध्ये सामील

9

उरी, 29 सप्टेंबर 2021: भारतीय लष्करानं उरी, जम्मू -काश्मीरमध्ये पाकिस्तानचा कट उधळलाय. 2016 मध्ये सर्जिकल स्ट्राईकच्या वर्धापनदिनापूर्वी, अनेक दहशतवादी पाकिस्तानच्या बाजूनं घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते, ज्याला लष्करानं उधळलं. तसेच एक मोठं यश म्हणजे भारतीय लष्करानं लष्कर-ए-तय्यबाच्या एका दहशतवाद्याला जिवंत पकडलं आहे.

18-19 सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या या संपूर्ण ऑपरेशनची माहिती मंगळवारी दुपारी लष्करी अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यावेळी, गस्तीदरम्यान, सैनिकांना सीमेवर पाकिस्तानच्या बाजूनं आतंकवादी येताना दिसले.

जिवंत पकडलेला दहशतवादी कोण?

गेल्या सात दिवसांत सात दहशतवादी मारले गेले आहेत, पण हा पकडलेला दहशतवादी फक्त 19 वर्षांचा आहे. अली बाबर असं या दहशतवाद्याचं नाव असून तो लष्कर-ए-तय्यबाचा आहे.
पाकिस्तानच्या पंजाबमधील दिपालपूरमधील वासेवाला गावातून आलेला दहशतवादी अली बाबर यानं सातवीपर्यंत शिक्षण घेतलंय. पण, एवढ्या लहान वयात त्यानं दहशतीच्या वाटेला सुरुवात केली आणि ऑपरेशनसाठी थेट भारतात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, 25 सप्टेंबर रोजी झालेल्या कारवाईदरम्यान पाकिस्तानी दहशतवादी अतिक उर रहमान मारला गेला आणि त्यानंतर त्याच्यासोबत असलेला अली बाबरने आत्मसमर्पण केलं. यामुळं सर्व 6 दहशतवादी पंजाब, पाकिस्तानचे रहिवासी असल्याची माहिती मिळाली.

वडिलांच्या मृत्यूनंतर अली बाबर लष्करमध्ये सामील झाला होता, त्याला आई आणि बहीण आहे. 2019 मध्ये अली बाबरने खैबर पख्तनुवा येथे प्रशिक्षण घेतलं. अली बाबरने सांगितलं की अतीक उर रहमानने त्याला त्याच्या आईच्या उपचारासाठी 20 हजार रुपये देण्याचे सांगितलं होतं, तर 30 हजार रुपये परताव्यावर दिले जाणार होते.

भारतीय सैन्याला यश कसं मिळालं?

उरीमध्ये सुरक्षा दलांनी केलेले ऑपरेशन हे गेल्या 10 दिवसांचे कठोर परिश्रम आहे. 18-19 सप्टेंबर रोजी सुमारे 6 दहशतवादी घुसखोरी करताना दिसले, दोन दहशतवादी भारतीय बाजूने होते. त्यापैकी एक ठार झाला आणि दुसऱ्याला जिवंत पकडण्यात आलं. हे सर्व दहशतवादी शस्त्र पुरवण्यासाठी भारतात येत होते.

उरी सेक्टरच्या आसपास अलीकडच्या काळात घुसखोरीचे अनेक प्रयत्न झाले, त्या दरम्यान 7 दहशतवादी मारले गेले. भारतीय लष्कराचे मेजर जनरल वीरेंद्र वत्स यांनी या ऑपरेशनबद्दल सांगितलं की, दहशतवाद्यांना त्याच सलामाबाद नाल्यातून घुसखोरी करायची होती, जी दहशतवाद्यांनी 2016 च्या उरी हल्ल्यासाठी वापरली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा