या” देशात २.५ कोटी कोरोना रुग्ण? तर आणखी ३ कोटी रुग्ण वाढीची भिती…

तेहरान, दि. १९ जुलै २०२०: कोरोनाने संपुर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आसून आता तर संपूर्ण पातळी ओलांडून या विषाणुने इराण मधे हाहाकार माजवला आहे. जगभरातल्या अनेक देशांत कोरोनाची कोट्यावधी जणांना बाधा झाली आहे. आतापर्यंत सगळ्यात जास्त फटका अमेरिकेला बसल्याचे दिसत होते. मात्र इराणमधल्या २ कोटी ५० लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आसल्याची माहिती इराणच्या राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी दिली आहे.

शनिवारी एका दिवसात २ लाख ७१ हजार ६०६ नवे पाॅजिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार तेथील परिस्थिती किती भयावह आणि भीषण आहे याचाही अंदाज आता संपूर्ण जगाला येत आहे. इराणमधील कोरोनाच्या टेस्ट वाढवल्यामुळे हा अकडा समोर आल्याचे सांगितले जातंय तर जागतिक कोरोना क्रमवारीत अचानक इराण प्रथम स्थानी आला आहे.

इराणमध्ये आणखी ३ कोटी लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते अशी भिती देखील इराणच्या राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी दिली आहे. तर आत्तापर्यंत करोनामुळे १४ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. फेब्रवारी आणि मार्च मधे कोरोनाने इराण मधे डोकं वर काढलं होतं त्या वेळी शेकडो मृतदेहांना पुरण्यासाठी तिथे कबरी खोदण्यात आल्या होत्या. तर आता परत कोरोनाने इराण मधे आसे डोकं वर काढले आहे.

इराण मधे कोरोनाने अचानक असे डोकं वर काढल्या मुळे कोरोना रुग्ण वाढीचे सर्व रेकाॅर्डच मोडले आहेत तर तेथील सरकारच्या समोर विषाणुला आटोक्यात आणण्याचे मोठे अव्हान समोर उभे ठाकले आहे. त्यात ८ कोटी लोकसंख्या असलेल्या इराण मधे आडीच कोटी कोरोना रुग्ण सापडले असून पुढे ३ कोटी रुग्ण वाढणार अशी भिती तेथील सरकारने व्यक्त केली.

ज्या मुळे इराणच नाही तर जगभरातील सर्वच देशांनी या घडीला सर्तक राहयचे आहे. कारण जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचा अणखी वाईट काळ यायचा बाकी आसल्याचे सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा