२.५ महिन्याच्या बाळाचा चाॅकलेट मुळे मृत्यू

उत्तर प्रदेश, १ ऑगस्ट २०२० : घरात एखादं लहान बाळ असलें की घरातील वातावरण हे नेहमी मुक्त व स्वंच्छदी वाटते. बाळाचे जसे लाड केले जातात तशी काळजी पण घेतली नाही तर अनेक छोट्या घटना घडतात ज्या मोठ्या घटनेत प्रवर्तित होतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेश मध्ये घडली आहे. ज्यामध्ये बाळाचा श्वास गुदमरुन मृत्यू झाला.

उत्तर प्रदेश मध्ये २.५ महिन्याच्या बाळाच्या घशात चाॅकलेट आडकल्याने त्याचा श्वास गुदमरुन मृत्यू झाला आहे.ज्यामुळे संपुर्ण परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. चाॅकलेट गळ्यात अडकल्यामुळे बाळाची तब्येत बिघडली म्हणून रुग्णवाहिकेला बोलविण्यात आले. पण बराच वेळ लोटून गेला मात्र रुग्णवाहिका काही आली नाही. मग शेवटी रिक्षाने रुग्णालय गाठण्यात आले.पण तो पर्यंत वेळ निघून गेली होती आणि बाळाने जीव सोडला होता.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित होतात ज्याचा एक जबाबदार पालक म्हणून सुद्धा विचार करणेचे गरजेचे आहे.ज्यामध्ये अाडीच महिन्याच्या बाळाला चाॅकलेट कोणी दिले ? ज्यावेळी चॉकलेट दिले तेंव्हा त्यांना भान होते का कि हे चाॅकले आडीच महिन्याचे बाळ खाईल? जर कोणासमोर दिले असेल किंवा खाऊ घातले असेल तेव्हा थांबविण्यात का आले नाही? तर प्रशासनावर देखील इथे सर्वात महत्वाचा प्रश्न उपस्थित होताना दिसतो रुग्ण वाहिकेला फोन केला असता उशीर का झाला? जर रुग्णवाहिका लवकर आली असती तर त्या बाळाचे प्राण आज घडीला वाचले आसते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा