पुणे, १८ ऑगस्ट २०२१: पुणे महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पुरग्रस्तांसाठी २ कोटीं १ लाख रुपयांचा निधीचा धनादेश मा. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे जिल्हा अजितदादा पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध भागात महापुराने नुकसान झालेल्या भागासाठी आर्थिक मदत म्हणून पुणे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे २ कोटी १ लाख रुपयांचा धनादेश महापौर मुरलीधर मोहोळ याच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यंदाही कोकण भागात पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. तर अनेक घरे देखील उध्वस्त झाली आहेत. वित्त हानी बरोबरच जीवित हनी देखील झाली आहे. या परवशभुमिवर ही मदत करण्यात आली आहे.
आमदार भीमराव तापकीर, आमदार माधुरीताई मिसाळ, उपमहापौर सौ. सुनीताताई वाडेकर, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) ज्ञानेश्वर मोळक, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, उपायुक्त (सामान्य प्रशासन) सुनील इंदलकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीमती उल्का कळसकर, मुख्य कामगार कल्याण अधिकारी शिवाजी दौंडकर, पीएमसी एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष प्रदीप महाडिक, आशिष चव्हाण, अजय उमंदे, गोपाळ चव्हाण इत्यादी यावेळी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे