देशात गेल्या २४ तासात २ हजार ७५६ नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली, ९ ऑक्टोबर २०२२: गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत होते. मात्र, काल पुन्हा एकदा बाधितांची संख्या वाढली आहे. गेल्या २४ तासात देशात नवे २ हजार ७५६ रुग्ण आढळून आले. ही संख्या मागच्या काही दिवसांतल्या रुग्णसंख्येपेक्षा सुमारे ९०० पेक्षा अधिक आहे. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

दिलासादायक बाब म्हणजे, रुग्णसंख्या वाढत असली तरी, रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सद्यस्थितीत देशात २९ हजार २५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर पॉझिटिव्हिटी रेट १.०५ टक्के इतका आहे. तर कालच्या दिवशी २१ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ४ कोटी ४० लाख ५४ हजार ६२१ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत ५,२८, ७९९ जणांनी आपला जीव गमावला आहे.

यासोबतच काल दिवसभरात ४ लाख ७३ हजार ६८२ लसींचे डोस देण्यात आले. तर आतापर्यंत देशातील २, १८,९७,८८,१०४ जणांना लस देण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा