पाकमध्ये ट्रेन आणि मिनी बसमध्ये जोरदार धडक, २० शीख भाविकांचा मृत्यू

फारुखाबाद, दि. ४ जुलै २०२०: पाकिस्तानामधील फारुखाबाद येथे ट्रेन बस मध्ये आपघात झाल्यामुळे २० शीख भाविकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे, तर अन्य ८ गंभीर जखमी झाले आहे.

कराचीहून लाहोरला परतताना मिनी बसला रेल्वेने धडक दिल्याने २० जणांचा मृत्यू झाला. मृतांमधील बहुतेक पाकिस्तानी शीख भाविकांचा समावेश आहे. रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. बचाव कार्य सुरु आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या भाविकांचे मृतदेह बाहेर काढले जात आहेत. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांनी दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पॅसेन्जर ट्रेनने या बसला धडक दिली. या बसमध्ये जास्तकरुन भाविक होते, जे ननकाना साहिबवरुन परतत होते.

लाहोरपासून ६० किमी अंतरावर हा आपघात घडला आहे. चालकाने रेल्वे क्राँसिंग टाळण्यााठी चुकीचा रस्ता घेतल्याने ही घटना घडली आसल्याचे आधिकार्यांनी सांगितले आहे. पेशावर येथून २६ शीख भाविक एका मिनी बसमधून नानकाना येथील गुरुद्वारात प्रार्थनेसाठी गेले होते आणि तेथून परतत आसताना सच्चा सौदा फारुखाबाद शेखुपुरा येथील रेल्वे क्राँसिंगवर त्यांच्या मिनी बसला भरधाव शाह हुसैन एक्सप्रेस ने उडवले. हि गाडी कराचीहून लाहोरला जात होती.

या घटने दरम्यान पंतप्रधान मोदींनी देखील टिवीटर वर दुःख व्यक्त केले.”पाकिस्तानातील शीख भाविकांच्या मृत्यूमुळे मी दुखी झालो आहे. जखमी रुग्ण लवकर बरे होवो हि मी प्रार्थना करतो. माझ्या संवेदना त्यांचे कुटुंबिय व त्यांच्या मित्रांबरोबर आहे” असे मोदींनी म्हंटले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा