२०१९ या वर्षातील सर्वाधिक “हिट” ठरलेले ‘टॉप ‘५’ अ‍ॅप्स

२०१९ मध्ये अनेक प्रत्येक क्षेत्रात अनेक घडामोडी घडल्या. यात नवनवीन टेक्नोलॉजीच्या बाबतीतही अनेक नवनवीन बदल झाले. त्यात यंदाच्या वर्षात लोकांनी सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले अँप कोणते हे आपण पाहू या…

Tiktok : टिकटॉक हा अ‍ॅप बिजींगच्या ByteDance कंपनीने बनवलेला अ‍ॅप आहे. ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या गाण्यांवर किंवा डायलॉगवर तुमचे छोटे व्हिडिओ बनवू शकता. काही लोक या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकमेकांना चॅलेंजेस देऊ लागले.

NetFlix : वेबसीरिज हा प्रकार सध्या सोशल मिडियावर इतका धुमाकूळ घालत आहे. या वेबसीरिजला डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी नेटफ्लिक्स एक उत्तम माध्यम बनले.

Google Pay : डिजिटल पद्धतीने ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी गुगल पे एक उत्तम माध्यम बनले. या अ‍ॅपच्या माध्यमातून झटपट ऑनलाईन बँक व्यवहार, शॉपिंग, बिल भरणे अगदी सोपे झाले.

Helo : Helo हे भारतातले बेस्ट सोशल अ‍ॅप आहे. ५०००००००+अधिक वापरकर्त्यांसह विनामूल्य डाउनलोड चित्रे/व्हिडिओज शेअरिंग, चॅटिंग आणि मित्र बनविण्याकरिता एक उत्तम भारतीय सामाजिक अ‍ॅप आहे.

UTS : डिजिटल माध्यमाद्वारे कॅशलेस पद्धतीने रेल्वे तिकिट काढणे सोपे करण्यासाठी UTS अ‍ॅप खूपच फायदेशीर ठरले. हे सरकारी अ‍ॅप असल्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त रक्कम न जाता रेल्वे तिकिटाची मुळात जी किंमत ठरविण्यात आली आहे. तेवढीच रक्कम वापरली जाऊ लागली. यामुळे तिकिटांसाठी लांबच लांब रांगा लावण्यापासून रेल्वे प्रवाशांची सुटका झाली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा