२०२१ मानवासाठी २०२० पेक्षाही दहा पटीने घेऊन येत आहे घातक आव्हाने…..

नवी दिल्ली, २९ नोव्हेंबर २०२०: नवीन येणार्या वर्षा बद्दल म्हणजेच २०२१ च्या वर्षाची विदारक भविष्यवाणी करण्यात आली आहे. ज्यामुळे माणसाला आतापासूनच सावधानतेचा इशारा भेटला आहे. आंतरराष्ट्रीय संस्थेच्या फुड संस्थेने जगावर भुकेचे संकट येणार असल्याची माहिती दिली. तर आता त्या नंतर निकोलस औजुला या मानसशास्त्राज्ञाने एक घातक भविष्यवाणी केली आहे.

कोरोना मुळे तसही २०२० हे फार वाईट आणि दुखात जात आहे. मोजून महिना हे वर्ष संपायला राहिला आसून सर्व आतुरतेने २०२१ ची वाट पाहत आहेत. पण, २०२१ देखील मानवसाठी नविन आव्हान घेऊन येऊ शकतो अशी भविष्यवाणी होत आहे. ज्यामुळे मानवाने आधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.

२०२१ हे २०२० पेक्षाहीे घातक असेल अशी भविष्यवाणी मानसशास्त्राज्ञ निकोलस औजुला यांनी केली आहे. त्यांच्या नुसार पुढील दोन तीन वर्ष अशांतता माजेल, पिग फ्लू येईल, तो सर्व जगाला त्रासदायक ठरेल. एका मोठ्या नेत्याची हत्या होईल. एक मोठं सेक्स स्कँडल जागतिक शिखर संमेलनावर परिणाम करू शकते. ज्वालामुखीचा उद्रेक होईल. नताली पाॅर्टमॅन, किम कर्दाशियन आणि टाॅम क्रूझ यांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

एकीकडे अशी घातक भविष्यवाणी होत आहे. दुसरीकडे कोरोनाची दुसरी लाट उसळली आहे. पण, त्या पेक्षा ही वाईट आणि चिंता वाढवणारी बातमी म्हणजे हाँगकाँगमधे कोरोनाची चौथी लाट आली आहे. डान्स क्लबमधून कोरोनाचा संसर्ग फैलवला आसल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे. हाँगकाँगमधे आतापर्यंत ५,९४७ (२७/११/२०२० नुसार) कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली असून १०८ जणांचा मृत्यू झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा