२१ लाखांच्या चोरीच्या कार जप्त; दोन जण ताब्यात

मुंबई, २० सप्टेंबर २०२२: कार चोरीच्या ११ गुण्यांमध्ये सहभागी असलेल्या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून २१ लाख रुपयांची सात वाहने जप्त करण्यात आली आहेत. परवेज सय्यद हा कर्नाटकचा आणि कुर्ला येथील फय्याज अहमद हक अशी या दोघांची नावे आहेत. अशी माहिती कापूरबावडी पोलीसांनी सोमवारी दिली.

या प्रकरणाची माहिती देताना ठाणे झोनविचे पोलीस उपयुक्त (डीसीपी) डॉ.विनय राठोड म्हणाले ११ सप्टेंबर रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता आयपीसी कलम ३३९ नुसार कार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, एक टीम तयार करण्यात आली, ज्यांनी कल्याण तसेच सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आरोपींचा शोध घेतला. शेवटी, तांत्रिक आणि मानवी बुद्धिमत्तेने परवेज चा शोध घेण्यात पोलिसांना मदत केली, जो कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यात त्याच्या मूळ गावी लपला होता. अटक केली असताना त्याच्याकडे १२ सप्टेंबर रोजी नवी मुंबई चोरीला गेलेली मारुती बलेनो कार होती.

चौकशी दरम्यान परवेजने गाड्या चोरल्याची कबुली दिली आणि रविवारी अटक करण्यात आलेला भंगार व्यापारी फय्याज या त्याच्या साथीदारा बाबतही खुलासा केला. त्यांच्या मोडस ऑपरेंडीचे वर्णन करताना डीसीपी म्हणाले की त्यांनी खाजगी वाहनांव्यतिरिक्त भाड्याच्या गाड्याही चोरल्या. “सुरुवातीला, आरोपी कार मालकांना जास्त भाड्याचे आमिष दाखवत. ते मालकांना वेळेवर तीन ते चार हप्तेही भरायचे. नंतर ते त्यांचे मोबाईल फोन बंद करून ठेवायचे आणि गाडीचा चासी नंबर बदलून भंगारात विकायचे.”

न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा