मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी गेला आणि त्यानंतर खबरदारी म्हणून सरकारकडून आजच्या कॅबिनेटमध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी झाल्याशिवाय या आजारावर मात करण कठीण असल्यामुळे मुंबईतील लोकल सेवा स्लो-डाऊन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
सध्या मुंबईतील रेल्वे स्टेशनवर नेहमीपेक्षा गर्दी कमी असली तरीसुद्धा सरकारकडून लोकलच्या बाबतीत निर्णय घेतले गेले. तसेच २३ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे-मुंबई निझामाबाद, नागपुर-मुंबई, पुणे-नागपुर, भुसावळ-नागपुर यासारख्या लांबपल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्या १७ ते ३१ मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.











































