मुंबई: सध्या देशात कोरोणामुले हाहाकार माजला आहे. आत्तापर्यंत ५०० हून अधिक रुग्ण देशात आढळले आहे. तर महाराष्ट्रात १०१ रुग्ण आहेत. सध्या मुंबई मध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच एक खळबळ जनक गोष्ट समोर आली आहे. मुंबईत २५ लाख मास्क चा साठा जप्त करण्यात आला आहे. जीवनावश्यक गोष्टींमध्ये सध्या मास्क चा ही समावेश करण्यात आला आहे. सध्या डॉक्टरांसाठी मास्क ही गरजेची गोष्ट बनली आहे आणि त्यात असा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
आयुक्त परमवीर सिंग यांना याची टीप मिळाली होती. त्या नंतर ही कार्यवाही करण्यात आली आहे. मुंबईच्या क्राईम ब्रांच टीम ९ ने ही कारवाई केली आहे. या मध्ये २५ लाखांचे मास्क जप्त करण्यात आले आहे. अद्याप या विषयी आणखी माहिती समोर आलेली नाही. महाराष्ट्राचे गृहमंत्री घटना स्थळी पाहणी करण्यासाठी गेले आहेत.
या मास्क मध्ये एन ९५ मास्क चा समावेश आहे. हे मास्क अत्यावश्यक आहेत. कारण रुग्णांमध्ये डॉक्टर सतत वावरत असतात. अश्या वेळेस हे मास्क त्यांना उपलब्ध होत नाहीत. राज्यात मास्क ची कमतरता भासत असताना काही पैशांसाठी हा संतापजनक प्रकार काही लोकांनी केला आहे.
अजून आरोपींची नावे सार्वजनिक करण्यात आली नाहीत. या मास्क चे ३ ट्रॅक पकडले गेले आहेत. अधिकाऱ्यांकडून असे समजते की हे मास्क १५ ते २० कोटी रुपये किमतीचे आहेत. या पूर्वी ही मुंबईत बनावट सेनीटायजर जप्त केले गेले होते.