रोममध्ये अडकलेल्या २६३ भारतीय विद्यार्थी परतले भारतात

नवी दिल्ली: कोरोना व्हायरस (कोविड -१९) च्या संकटात रोममध्ये अडकलेल्या २६३ भारतीय विद्यार्थी रविवारी एअर इंडियाच्या राष्ट्रीय वाहकातून घरी परतले आहेत. दिल्ली विमानतळावर थर्मल स्क्रीनिंग आणि इमिग्रेशननंतर, सर्व विद्यार्थ्यांना दिल्लीतील आयटीबीपी चावला क्वारेंटाइन फैसिलिटी  सुविधेमध्ये १४ दिवस ठेवण्यात येईल आणि तेथे त्यांची चाचणी घेण्यात येईल.

भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी शनिवारी दुपारी ७८७ ड्रीमलाइनर विमान पाठविण्यात आले. गुरुवारी केंद्राने एक निवेदन जारी केले असून असे म्हटले आहे की, २२ मार्चपासून एका आठवड्याच्या कालावधीसाठी कोणत्याही आंतरराष्ट्रीय उड्डाणे भारतात येण्याची परवानगी नाही.

करोना व्हायरसने देशातही हाहाकार उडवल्याने करोनाला पायबंद घालण्यासाठी जनतेमध्ये जागरूकता यावी म्हणून आज संपूर्ण देशात जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत आज मध्यरात्रीपासून सामान्य नागरिकांसाठी लोकलसेवा बंद करण्यात आल्या आहेत. तर महाराष्ट्रासह तेलंगण, गुजरात मध्यप्रदेश आदी आठ राज्यांच्या आंतरराज्य एसटी फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. तसेच गो एअर त्यांच्या सर्व सेवा बंद ठेवणार आहे. अन्य कंपन्याही काही उड्डाणे रद्द करणार आहेत. यामुळे मुंबईहून २०० हून अधिक विमाने रद्द होणार आहेत. शिवाय राज्यातील सर्वच शहरातील बाजार पेठाही बंद राहणार आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा