मुंबई, २२ जून २०२० : महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी एका ट्वीट द्वारे सांगितले की, कोविड १९ मुळे लागू झालेल्या लॉकडाऊन पासून राज्यात भारतीय दंड संहिता कलम १८८ अन्वये २४,४६६ लोकांना अटक करण्यात आली आहे.
आयपीसीच्या १८८ अंतर्गत आतापर्यंत १,३३,७३० गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
यामध्ये २७,४६६ जणांना अटक असून, ८३,९७० वाहने जप्त करण्यात आली आहेत.
अनिल देशमुखांनी ट्विट करत म्हटले आहे की, गुन्हेगारांकडून एकूण ८,४१,३२,४६१ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की महाराष्ट्र सरकारने कोविड १९ मुळे लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढविला आहे.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कोविड १९ च्या एकूण केसेस १,३२,०७५ झाल्या असून ६,१७० जणांचा मृत्यू झाला आहे. या संसर्गजन्य आजाराने सर्वाधिक बळी पडलेले महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.
१४,८२१ नवीन प्रकरणे आणि ४४५ मृत्यूंच्या वाढीसह, भारतातील कोविड १९ ची संख्या
सोमवारी ४,२५,२८२ इतकी पोहचली आहे. यात एमओएचएफडब्ल्यूच्या म्हणण्यानुसार, १३,६९९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी