गुजरात मध्ये पाकिस्तानी बोटीतून 280 कोटी रुपयांचा हेराँईनचा साठा जप्त

अहमदाबाद, 17 जून 2022: गुजरातचे दहशतवादविरोधी पथक आणि भारतीय तटरक्षक दलाने संयुक्त कारवाई करीत अरबी समुद्रात पाकिस्तानी बोटीतून आलेला मोठ्या प्रमाणावरील हेराँईन चा साठा जप्त केला. या कारवाईत 9 पाकिस्तानी नागरिकांसह 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तस्कराकडूण तब्बल 280 कोटी रुपयांचे 56 किलो हेराँईन जप्त करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांत गुजरातमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. तपास यंत्रणा धडक कारवाई करीत असतानाही तस्करांना चाप बसलेला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

एकीकडे पाकिस्तानी बोटीतून आलेला अमली पदार्थांच्या मोठा साठा जप्त केला आसतानाच बडोधातही मोठी कारवाई करण्यात आली. गुजरात पोलिसांनी बुधवारी केलेल्या या कारवाईत चार डृग्ज विक्रेत्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीअंती त्यांचा अमली पदार्थ तस्करीतील सहभाग उघडकीस आला.

मध्य प्रदेशामधून वडोदरा येथे मेफेडो़न ड्रग्जची तस्करी केली जात होती. त्यात सहभाग असल्याचा आरोपावरून चौघांना अटक करण्यात आली आहे.पोलीसांनी त्यांच्याकडून 8 लाक रुपये किंमतीचे 81 ग्रॅमपेक्षा जास्त ड्रग्स जप्त केला आहे. बडोदा पोलिसांचे एसीची जे बी गौर यांनी एएनआयला माहिती देत कारवाईच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की आम्ही 4 तस्कराना ताब्यात घेतले आहे. त्याच बरोबर एक वाहन जप्त करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा