संत श्री सेवालाल महाराज यांची २८५ वी जयंती माणगावमध्ये साजरी

माणगांव, १६ फेब्रुवारी २०२४ : माणगांव शहरातील गोरबंजारा समाज सामाजिक मंडळ यांच्या वतीने संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती प्रतिवर्षी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते. यावर्षी देखील १५ फेब्रुवारी रोजी गोरबंजारा समाजाचे नेतृत्व पुन्नु राठाेड यांच्या एकता नगर येथील निवासस्थानी संत सेवालाल महाराज यांची २८५ वी जयंती साजरी करण्यात आली. त्यामध्ये संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व होमहवन (भोग) करण्यात आले. तसेच पुन्नु राठोड यांनी आपली पत्नी, मुलगा, मुली यांच्या सोबत मनोभावे संत सेवालाल महाराज व दुर्गा मातेचे दर्शन व पूजन केले.

संत सेवालाल महारांजाचे सामाजिक कार्याबद्दल समाज बांधवाना संबाेधित करताना पुनू राठाेड यांनी सांगितले की,फक्त स्वत:च्या समाजापुरतेच मर्यादीत न राहता संत सेवालाल महाराजांनी कार्य केले. १७ व्या शतकापासून आजपर्यंत गाेरबंजारा समाज या महान संताची जयंती साजरा करत आला आहे आणि आज त्यांची २८५ वी जयंती साजरी हाेत आहे. शिवाय सेवालाल महाराजांचे त्याकाळात काेकणाशी संबंध फार चांगले हाेते. त्याकाळात बाराबलुतेदारी व वस्तुरुप देवाण-घेवाण पध्दती सुरु असता सेवालाल महारांजाकडुन काेकणातील मीठागरातुन मीठ नेऊन त्याबदल्यात धान्याची परतफेड हाेत हाेती. गाेरबंजारा समाज हा पुर्वीपासुन भटकंती व तांड्याने राहणारा समाज असल्याने संत सेवालाल महाराजांचे वडील त्या काळात ७०० तांड्याचे प्रमुख नायक (मुकादम) हाेते. सेवालाल महाजांना माेतीवालाे, गादीवालाे, धाेळीघाेडीवाले या प्रमुख नावाने त्याकाळी ओळखले जायचे अशा महान संताचा आदर्श डाेळ्यासमाेर ठेऊन प्रत्येक समाजबांधवाने कार्य करावे असे मत देखीलआजच्या जयंती निमित्त पुनु राठोड यांनी व्यक्त केले.

काेराेना महामारी असाे किंवा निसर्ग चक्रीवादळ असाे या काळात समाजाचा एक प्रतिनिधी म्हणुन शासनाचे वेळाेवेळी उंबरठे झिजवून आवश्यक असणारी मदत प्रत्येक समाजघटकांपर्यत पाेहचविण्याचे काम मी आणि माझ्या कुटुंबीयांनी केले आहे. तसेच सामाजिक विचारांची देवाण-घेवाण व सुख: दुख: एकमेकांना कळावीत याकरीता सेवालाल जयंतीचे औचित्य साधुन आमच्या कडून असे समाजपयाेगी कार्यक्रम घेतले जात असतात,असे उद्गार गाेरबंजारा समाजाचे सामाजिक नेतृत्व पुन्नु राठाेड यांनी काढले. माणगांव तालुक्यातील शेकडाे गाेरबंजारा समाजबांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी पुन्नु राठोड यांच्या निवासस्थानी या कार्यक्रमास उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रमोद जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा