माणगांव, १४ मार्च २०२४ : अभिधम्मा एज्यूकेशनल अँड सोशिअल ट्रस्टव्दारे रविवार १७ मार्च २०२४ रोजी सकाळी ०८:०० ते सायं ०६ : ०० या वेळात यासीन परदेशी, शमीम मुल्ला मैदान मोरबा रोड, माणगाव, जि. रायगड येथे दुसऱ्या आंतराष्टीय बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्यध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर हे या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेला प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच दानशूर व्यक्तीमत्व सी. आर. सांगलीकर परिषदेचे उद्घाटक आहेत. तसेच डॉ. अनिलकुमार गायकवाड व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य, रस्ते विकास महामंडळ हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत. जेष्ठ समाजसेव व उद्योजक अंकुश सकपाळ हे स्वागतध्यक्ष असून युवा नामवंत उद्योजक नरेशजी अहिरे, युवा नामवंत उद्योजक सुशांत मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याचे परिषदेचे मुख्य संयोजक भंदंन्त, रत्नप्रिय थेरो आणि पुज्य भंदंन्त शांतीरत्न महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत आज माणगांव येथे सासरवाडी हाँटेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी बोलताना सांगितले. तसेच पुज्य भदंन्त डॉ. उपगुप्त महाथेरो, आखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. एम. सत्यपाल महाथेरो आणि पुज्य भदंन्त गुणरत्न महाथेरो यांचे २१ व्या शतकातील जागतिक आव्हाने आणि बुध्दाचा संदेश यावर या धम्म परिषदेत प्रवचन व माहिती देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवमुक्तींच्या लढयाचे केंद्रबिंदू असलेल्या रायगड जिल्हयात नागोठणे, खारघर, महाड येथे उपासकाच्या वतीने आजपर्यंत या ठिकाणी बौध्द धम्म परिषदा संपन्न झाल्या. तसेच माणगाव येथे २०१५ नंतर ही दुसरी भव्य दिव्य अशी बौध्द धम्म परिषद भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली उपासकाच्या वतीने घेण्यात येत आहे. या धम्म परिषदेमध्ये रायगड जिल्हयातील बौध्द संस्कृतीच्या खाणाखुना आणि विद्यावान बौध्दांची जबाबदारी यावर विचार मांडले जाणार आहेत. रायगड जिल्हयात धम्म, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, समाजकार्य क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या व्यक्ती आणि संस्थाचा सन्मान यावेळी बौध्दजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष आनंदराज आंबेडकर आणि जेष्ठ विचारवंत प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर यांच्या हस्ते केले जाणार आहे.
तसेच यावेळी नामदेव भाई कासारे, काशिनाथ मोरे सिध्दार्थ मोरे, संजय गमरे, यशपाल साळवी, अँड राकेश मोरे, संतोष मोरे, राजेश हाटे, प्रवीण बागवे, राजू तांबे, उत्तम तांबे, बाजीराव गायकवाड व सिम्बॉल ऑफ नॉलेज आणि इतर धम्म उपासक परिषदेला यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले. भगवान बुध्दाची प्रतिमा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सचित्र असलेली त्रिपिटक, बुध्द आणि त्यांचा धम्म आणि भारताचाचे संविधान असलेली धम्म रॅली सकाळी ९ वाजता काढण्यात येणार आहे. धम्म ध्वजारोहण, बुध्द वंदना, भिक्खू संघास चिवर दान, मान्यवरांचे सन्मान व बुध्दधम्माच्या चळवळीला गतिमान करणारे तथा भारतीय बौध्दांच्या सक्षमीकरणाचा अजेंडा ठरावाच्या रुपाने या परिषदेमध्ये जाहीर केला जाणार आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील तमाम बौध्द बांधवानी या जागतिक धम्म परिषदेला सफेद वस्ञ परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन भन्ते रत्नप्रिय थेरो यांनी उपासक आणि उपासिकेना केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रमोद जाधव