गोल पोस्ट इतर पर्यावरण पशू-पक्षी प्रदर्शनासाठी ३.७४ कोटी! शिर्डीत मार्चमध्ये भरणार राज्यस्तरीय प्रदर्शन

पशू-पक्षी प्रदर्शनासाठी ३.७४ कोटी! शिर्डीत मार्चमध्ये भरणार राज्यस्तरीय प्रदर्शन

नगर, २८ फेब्रुवारी २०२३ : शिर्डी येथे मार्चमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय पशू-पक्षी प्रदर्शनाची सर्वांनाच उत्कंठा लागली आहे. जिल्ह्यात प्रथमच अशाप्रकारे प्रदर्शन भरविले जाणार असून, त्यासाठी प्रशासनाकडूनही तयारीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने या प्रदर्शनासाठी नुकतीच ३.७४ कोटींची तरतूद केली. ‘अहमदनगर महोत्सव’ यशस्वी झाल्यानंतर आता मार्च २०२३ मध्ये शिर्डी येथे पशू-पक्षी प्रदर्शन भरविले जात आहे.

महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या देखरेखीखाली या प्रदर्शनासाठी तयारी सुरू आहे. राज्यातील तसेच राज्याबाहेरील जातिवंत पशू-पक्षी; तसेच त्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन करण्यासाठी आवश्यक यंत्रे, उपकरणे, औषधे; तसेच पशुसंवर्धनासाठी निगडित बाबींचे स्टॉल उभारणे, जातिवंत पशू-पक्ष्यांमधून सर्वोत्कृष्ट पशुधनाची निवड करून पशुपालकांना सन्मानित करण्यात येणार आहे.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे काल दुपारी जिल्हा परिषदेत आले होते. यावेळी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्यासह अन्य विभागप्रमुखांसमवेत चर्चा केली. शिर्डी येथील पशू-पक्षी मेळाव्याच्या तयारीबाबतही त्यांनी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची मते जाणून घेतल्याचेही समजले. याप्रसंगी एक्स्प्रेस फिडरसह अन्य वीज प्रश्नांबाबत त्यांनी महावितरणला सूचना केल्या आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version