कदमवाकवस्ती मध्ये सापडले ३ कोरोना रुग्ण

कदमवाकवस्ती: कदमवाकवस्ती मध्ये एका नामांकित हॉस्पिटलमध्ये कोरोनटाईन केलेल्या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांपैकी तिन व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना बाधित आला आहे. कदम वाकवस्ती ग्रामपंचायतने मात्र खबरदारी म्हणून कदमवाकवस्ती मध्ये जीवनावश्यक वस्तुसह मेडिकल, दुध डेअरी, वगळुन सर्व प्रकारची दुकाने उद्या दि.२३ तारखेपासून २५ एप्रिल २०२० प्रयन्त पूर्ण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कदम वाकवस्ती च्या सरपंच गौरी गायकवाड व ग्रामसेवक प्रविण देसाई उपसरपंच बाबासाहेब काळभोर यांनी नागरिकांना कोणत्याही प्रकारची भीती बाळगु नये आपणा सर्वांनी पुन्हा प्रशासनाला सहकार्य करा व घरातून बाहेर पडू नका असे आव्हान कदम वाकवस्ती च्य सर्व नागरिकांना केले आहे. ग्रामपंचायतच्या वतीने आवश्यक त्या गोष्टी नागरिकांना देऊ पण, आपण प्रशासनास सहकार्य करा अफवांवर विश्वास ठेऊ नका घरीच राहा सुरक्षित राहा घाबरून जाण्याचे कारण नाही असे ‘न्यूज अनकट’शी बोलताना सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा