निमजाई देवीच्या मंदिरात ३ लाखांच्या दागिन्यांची चोरी, घटना सीसीटिव्ही त कैद

फलटण, ४ ऑक्टोबर २०२०: फलटण तालुक्यात नीमजाई देवीच्या देवळातून ३ लाखांच्या दागिन्यांची चोरी होण्याची घटना समोर आली आहे. यात देवीच्या पाठीमागचे आणि बाजूला बसविण्यात आलेले चांदीचे मखर, देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र व देवीची नथ अशा सुमारे ३ लाख रुपये किमतीचे ऐवज चोरांनी लंपास केले आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री १२:३० वाजता घडली असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. या घटनेंची नोंद मंदिर प्रशासनाने फलटण येथील ग्रामीण पोलिस स्थानकात नोंदवली आहे.

मंदिराचे मुख्य विश्वस्त राम निंबाळकर यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थ व भक्त मंडळींच्या सहकार्याने या पुरातन मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार केला असून मंदिराच्या मुख्य इमारती सह परिसर सुशोभित करण्यात आला आहे. निमजाई देवीच्या मुख्य गाभाऱ्यात देवी मातेच्या मूर्तीचे बाजूने सुमारे २ किलो चांदीची मखर तयार करून बसविण्यात आली होती. तर देवीच्या गळ्यात १ तोळा वजनाचे सोन्याचे गंठण, सोन्याची नथ होती. मुख्य गाभाऱ्याला असलेले कुलूप काढता न आल्याने कटवणीनेच चांदीचे मखर काढून घेताना दोघे इसम मंदिरातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

तसेच पोलिसांनी हे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल करून सदर इसमांना पाहिल्यास पोलिसांशी संपर्क साधन्याचे आवाहन केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा