पंढरपूर २० फेब्रुवारी २०२४ : माघी यात्रेसाठी विठुरायाच्या नगरीत आषाढी, कार्तिकी एकादशीप्रमाणे माघी यात्रेला देखील भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात. पंढरपुरात माघी यात्रेनिमित्त पंढरीनाथाच्या नगरीत भावी दाखल झाले आहे. यात्रेला पंढरपुरात आज सकाळपासून ज्ञानेश्वर दर्शनमंडप येथे नामदेव पायरीचे सुमारे लाखों भाविकांनी दर्शन घेतले असून विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब रांग लागलेली पाहायला मिळाली.
आज माघी वारी म्हणजेच जया एकादशी संपन्न होत असून, पंढरपुर येथे पहाटे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची नित्य पूजा ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर तसेच श्रीमती शकुंतला नडगिरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. विठू नामाच्या गजरात दर्शन रांग आणि मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला आहे. माघी यात्रा निमित्त श्री.विठ्ठल व श्री.रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात फुलांची सुंदर व मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे.
भेटी लागी जीवा, लागलीस आस, असं म्हणत माघी यात्रेच्या निमित्ताने वारकरी भाविक दर्शन रांगेत गर्दी करत आहेत. या वारकरी भाविकांना श्रीचा प्रसाद म्हणून तांदळाची आणि साबुदाण्याची खिचडी वाटप करण्यात येत आहे, खिचडी बरोबर चहा आणि मिनरल वॉटर देखील देण्यात येत असल्याचे कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके यांनी सांगितले. प्रसाद घेऊन वारकरी भाविक कृतज्ञता व्यक्त करीत होते. दर्शनासाठी आलेल्या भक्ताच्या मुखात प्रसाद रूपी दोन घास पडावे व कोणीही उपाशी जावू नये याची मंदिर समितीने खबरदारी घेतली आहे.
न्युज अनकट प्रतिनीधी : नवनाथ खिल्लारे