‘ग्रीन ग्रोथ’अंतर्गत १५ वर्षांहून जुनी ३ लाख वाहने स्क्रॅप करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती

नवी दिल्ली, २३ फेब्रुवारी २०२३ : यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात ग्रीन ग्रोथसंदर्भात जी तरदूत करण्यात आली आहे ती एक प्रकारे आपल्या भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठीची पायाभरणी आहे. २०१४ पासूनच भारत हरित क्षमता जोडण्यात सर्वांत वेगवान काम करीत आहे. त्यामुळे येत्या काळात जगाच्या ग्रीन इंडस्ट्रीत भारत महत्त्वाचा भाग बनेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ग्रीन ग्रोथवरील पहिल्या पोस्ट-बजेट वेबीनारमध्ये ते बोलत होते.

भारताचे वाहन स्कॅपिंग धोरण हा भारताचा हरित विकास धोरणाचा प्रमुख भाग आहे. येत्या काही महिन्यांत १५ वर्षांहून जुनी सुमारे ३ लाख वाहने स्क्रॅप केली जाणार आहेत. अर्थसंकल्पीय धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी आपण एकत्रिपणे आणि झपाट्याने काम करणे आवश्यक असल्याचे मोदी यांनी म्हटले. हरित ऊर्जेशी संबंधित तंत्रज्ञानामध्ये भारत जगात आघाडी घेऊ शकतो.

यावेळी बोलताना ते म्हणाले, की हरित वाढ आणि ऊर्जा संक्रमणासाठी भारताने तीन टप्पे नियोजित केले आहेत. यामध्ये नूतनीकरणक्षम ऊर्जा उत्पादन वाढविणे, जिवाश्म इंधनाचा वापर कमी करणे आणि गॅस-अधारित अर्थव्यवस्थेसह पुढे जाणे, सौर उत्पादनास प्रोत्साहण देणे, छतावर सौर योजना, कोळसा गॅसिफिकेशन यांचा समावेश आहे. पुढे पंतप्रधान म्हणाले, की मी ऊर्जा जगताशी संबंधित सर्व भागधारकांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करीत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा