कुलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीसांसह ३ नेत्यांचा मृत्यू

जम्मू-काश्मीर, ३० ऑक्टोबर २०२०: जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हत्येची प्रकरणं थांबण्याचं नाव घेत नाही. आता कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस फिदा हुसेन यांच्यासह ३ नेत्यांना ठार मारलं. ओमर रशीद बेग आणि अब्देर रशीद बेग अशी आणखी दोन नेत्यांची नावं आहेत.

गुरुवारी रात्री आठ वाजता भाजपच्या तीन नेत्यांवर दहशतवादी हल्ल्याचा अहवाल कुलगाम पोलिसांना मिळाला. यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. फिदा हुसेन, ओमर रशीद बेग आणि अब्देर रशीद बेग अशी ओळख पटविल्या गेलेल्या नेत्यांची नावं आहेत, ज्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची प्राथमिक चौकशीत उघडकीस आलं आहे. या हल्ल्यात तिघेही जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते, जिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

यासंदर्भात पोलिसांनी कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे. हा परिसर घेरला गेला आहे. कुलगामव्यतिरिक्त शोपियांमध्येही दहशतवादी हल्ला झाला आहे. यात एक तरुण जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

भाजप नेत्यांची सतत हत्या होत आहे

जम्मू-काश्मीरमध्ये भाजप नेत्यांवर सातत्याने हल्ले होत आहेत. गेल्या महिन्यात मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातही एका भाजप कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. बडगाममधील दलवास गावात भाजप कार्यकर्ते आणि ब्लॉक डेव्हलपमेंट कौन्सिलर (बीडीसी) ब्लॉक खग यांना त्यांच्या घरात गोळ्या घालून ठार मारण्यात आलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खग बडगामचे बीडीसी अध्यक्ष आणि सत्ताधारी भाजपचे सरपंच भूपिंदर सिंग यांना त्यांच्या घरी गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. दहशतवादी संघटना टीआरएफ’नं या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा