भारतात आणखीन ३ राफेल विमान दाखल, संख्या झाली १४

गुजरात- जामनगर, १ एप्रिल २०२१: फ्रान्समधून निघालेली तीन राफेल लढाऊ विमान बुधवारी रात्री भारतात पोहोचली. हे राफेल गुजरातच्या जामनगर एअरबेसवर उतरले. वृत्तसंस्था पीटीआयने याबाबत माहिती दिली. हे अंबाला येथील गोल्डन अ‍ॅरो स्क्वॉड्रॉनचा भाग असतील. हे तीन राफेल भारतात येताच भारताकडे अशी १४ लढाऊ विमाने झाली आहेत. फ्रान्सहून उड्डाण केल्यानंतर तिन्ही लढाऊ विमान युएईमार्गे भारतात पोहोचले. वाटेत युएई एअर फोर्सच्या मदतीने राफेल विमानांना हवेमध्ये रिफ्यूल केले गेले.

एप्रिलमध्ये फ्रान्समधून ७ ते ८ राफेल येणार आहेत, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. म्हणजेच, येत्या काही दिवसांत भारताकडे १० पेक्षा जास्त राफेल लढाऊ विमाने होतील. यानंतर, राफेल लढाऊ विमानांची संख्या २१ च्या आसपास पोहोचेल. सध्या ११ लढाऊ विमाने अंबालाच्या १७ व्या पथकाचा भाग आहेत. काल आलेली तीन विमानेही अंबालाच्या १७ व्या पथकाचा भाग असतील. आता भारताकडे एकूण १४ लढाऊ विमान आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सातच्या सुमारास तिन्ही राफेल विमान गुजरातला पोहोचतील. या तीन राफेल आल्यानंतर आता गोल्डन अ‍ॅरो स्क्वॉड्रॉनमध्ये राफेलची एकूण संख्या १४ झाली आहे.

बुधवारी भारतात आगमन झालेल्या राफेल लढाऊ विमानांमध्ये एम ८८-३ सफ्रानच्या दुहेरी इंजिनने सुसज्ज आहे. ज्यामध्ये स्मार्ट शस्त्रास्त्र यंत्रणा बसविली गेली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा