पाकिस्तान सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी ३ हजार अतिरिक्त सैन्य तैनात

काश्मीर, २० सप्टेंबर २०२०: भारत आणि चीनमध्ये बराच काळ तणाव सुरू आहे. चीनमार्गे भारताच्या सीमेवर घुसखोरीचे प्रयत्नही सुरू आहेत. दरम्यान, पाकिस्तान सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी भारतानं अतिरिक्त सैन्य तैनात केलंय.

नियंत्रण रेखामधील उच्च सरकारी सूत्रांनी सांगितलं की, भारत आणि चीन पूर्व लडाखमध्ये संघर्षात गुंतले आहेत अशा वेळी, पाकिस्तान समर्थित पाळलेल्या अतिरेक्यांचे घुसखोरीचे प्रयत्न रोखण्यासाठी भारतीय सैन्यानं नियंत्रण रेषेवर ३००० अतिरिक्त सैन्य तैनात केलं आहे. नियंत्रण रेखाच्या काश्मीर भागात दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या प्रयत्नांना रोखण्यासाठी अतिरिक्त सैन्य तैनात केले गेले आहे.

ते म्हणाले की घुसखोरीच्या बहुतेक सर्व मोठ्या प्रयत्नांना आळा घालण्यात सीमेवर अतिरिक्त सैनिक यशस्वी ठरले आहेत आणि दहशतवाद्यांना सीमा ओलांडून दिली गेली नाही. ते म्हणाले की भारतीय लष्कर नियंत्रण रेषेवर पूर्णपणे सक्रिय आहे आणि नुकतेच उत्तर काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न विफल करण्यात आला.

पाकिस्तानी बटालियन

सूत्रांनी सांगितलं की, सध्या नियंत्रण रेषेत पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या काही अतिरिक्त बटालियन उपस्थित आहेत, परंतु असं सांगणं कठीण आहे की, चिनी सैन्याच्याच पाठिंब्यानं भारतावर दबाव आणण्यास ते तिथं तैनात आहेत. जरी पाकिस्तानींनी यासाठी प्रयत्न केला तरी भारतीय सैन्य अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा