अमेरिकेत रोज ३००० मृत्यूची शक्यता

5

अमेरिका, दि. ५ मे २०२० : अमेरिका हा असा देश आहे जो कोरोना संसर्ग आणि मृत्यूच्या दोन्ही बाबतीत जगात अव्वल स्थानी आहे. संक्रमित लोकांची संख्या १२ लाखांच्या पुढे गेली आहे आणि मृतांची संख्या ६९ हजारांपेक्षा जास्त झाली आहे आणि हे आकडे वाढत आहेत. त्याच बरोबर न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार ट्रम्प प्रशासनाच्या अंतर्गत अहवालात असे सांगितले आहे की जूनमध्ये दररोज २ लाख नवीन प्रकरणे बाहेर येऊ शकतात.

अमेरिकेत लॉकडाउन कमी होण्यास सुरवात झाली आहे अशा वेळी दररोज २ लाख नवीन कोरोना बाधित रुग्णांचे मूल्यांकन समोर आले आहे. स्वत: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे लॉकडाउन हटवण्याविषयी जोरदारपणे बोलत आहेत आणि या विषयावर निदर्शने करणाऱ्या लोकांनाही पाठिंबा देत आहेत.

न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार ट्रम्प प्रशासनाच्या अंतर्गत अहवालात असे दिसून आले आहे की १ जूनपर्यंत कोरोनामधून दररोज होणाऱ्या मृत्यूची संख्या ३,००० वर पोहोचेल. सध्या अमेरिकेत दररोज सरासरी १७५० लोक कोरोना मुळे मारत आहेत. यूएस फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीच्या आकडेवारीच्या आधारे हे मूल्यांकन केले गेले आहे. सध्या अमेरिकेत दररोज सुमारे २५ हजार नवीन प्रकरणे येत आहेत, परंतु जूनमध्ये ही दररोज २ लाख होतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा