गुजरातमध्ये ३१ लाख रुद्राक्षांचा वापर करून बनवले ३१.५ फूट उंच शिवलिंग

धरमपूर, १८ फेब्रुवारी २०२३ :गुजरातमधील धरमपूरमध्ये एका अनोख्या शिवलिंगाचे अनावरण करण्यात आले आहे. हे शिवलिंग बनवण्यासाठी ३१ लाख रुद्राक्षांचा वापर करण्यात आला आहे. या शिवलिंगाची उंची ३१.५ फूट आहे. म्हणजेच तिची उंची जवळपास तीन मजली घराएवढी असून, आज महाशिवरात्रीनिमित्त या शिवलिंगाची विशेष पूजा करण्यात आली. या शिवलिंगाच्या दर्शनासाठी दूरदूरवरून लोक येथे पोहोचत आहेत.

  • सकाळपासूनच शिव मंदिरात भाविकांची गर्दी

दरम्यान, आज देशभरात महाशिवरात्री हा सण मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा होत आहे. गुजरातमध्येही या उत्सवाबाबत प्रचंड उत्साह आहे. सकाळपासूनच विविध शिवमंदिरात भाविकांची गर्दी झाली आहे. भाविक भगवान शंकराच्या नावाचा जप, मंत्र करताना दिसत असून, मंदिरात दर्शन घेण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा