कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी पीएम केअर फुंडातून ३१०० कोटींची मदत

नवी दिल्ली, दि.१४ मे २०२०: कोरोनाशी लढण्यासाठी पीएम केअर निधीमधून आतापर्यंत ३१०० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या narendramodi.in या संकेत स्थळावरून देण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती ट्वीटद्वारे दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्थलांतरित मजुरांसाठी १००० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच व्हेंटिलेटर खरेदीसाठी २००० कोटी रुपये आणि कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी १०० कोटी रुपये वापरले जाणार येणार आहे. या सर्व खर्चाला पीएम केअर्स फंडाच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

पंतप्रधान पद्धसिद्ध अध्यक्ष असलेल्या या ट्रस्टची स्थापना २७ मार्च २०२०रोजी झाली. संरक्षणमंत्री, गृहमंत्री व अर्थमंत्री हे या ट्रस्टचे पदसिद्ध सदस्य आहेत.

निधी वाटपाबाबत घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर्स फंडाला उदार अंतःकरणाने मदत करणाऱ्या सर्व दानशूर देणगीदारांचे विशेष आभार मानले. त्यांच्या या देणगीमुळे कोरोना विरुद्धची लढाई सक्षमपणे लढणे शक्य होत असल्याच्या भावना पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा