देशात ३२७७ तर राज्यात ११६५ नवीन कोरोना प्रकरणे

मुंबई, दि. १० मे २०२०: कोरोनाचा आकडा हा रोजच वाढताना दिसत आहे. आजची आकडेवारी सरकारने जारी केली आहे. दि. १० मे म्हणजेच आज सकाळ १० पर्यंतची माहिती अशी, पूर्ण भारतात आत्ता पर्यंत ६२,९३९ प्रकरणे आढळून आली आहेत. यामध्ये गेल्या २४ तासात ३,२७७ नवीन प्रकरणे वाढली आहेत. भारतात आत्तापर्यंत २,१०९ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्यात गेल्या २४ तासात १२८ नवीन मृत्यू समोर आले आहेत.

महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर आत्ता पर्यंत २०,२२८ प्रकरणे आढळून आली आहेत. यामध्ये गेल्या २४ तासात ११६५ नवीन प्रकरणे वाढली आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ७७९ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्यात गेल्या २४ तासात ४८ नवीन मृत्यू समोर आले आहेत. मृत्यू दर बघितला तर भारताचा ३.३५% आहे तर महाराष्ट्राचा ३.८५% इतका आहे. कालच्या प्रकरणांपेक्षा आज महाराष्ट्रात नवीन रुग्ण सपडण्याचा आकडा वाढला आहे. काल हाच आकडा १०८९ एवढा होता.

कोणत्या राज्यात किती प्रकरणे:

पश्चिम बंगाल १७८६
मेघालय १३
गुजरात ७७९६
मध्य प्रदेश ३६१४
हिमाचल प्रदेश ५०
महाराष्ट्र २०,२२८
कर्नाटक ७९४
आसाम ६३
राजस्थान ३७०८
तेलंगाना ११६३
आंध्र प्रदेश १९३०
उत्तर प्रदेश ३३७३
झारखंड १५६
पंजाब १७६२
उत्तराखंड ६७
हरियाणा ६७५
चंदीगड १६९
दिल्ली ६५४२
जम्मू आणि काश्मीर ८३६
बिहार ५९१
केरळ ५०५
ओडिशा २९४
तामिळनाडू ६५३५
अंदमान निकोबार ३३
अरुणाचल प्रदेश १
छत्तीसगड ५९
दादर नगर हवेली १
गोवा ७
लडाख ४२
मणिपूर २
मिझोरम १
पुडुचेरी ९
त्रिपुरा १३४
एकूण ६२,९३९

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा